Laxman Hake : … ते काकाला जमलं नाही, दादांनी गुलाबी स्वप्न बघू नये; मुख्यमंत्रिपदावरून हाकेंचा घणाघात
अजित पवार निधी देत नाहीत, अशी टीका अजित पवार यांच्यावर केली जात असल्याचे दादा म्हणाले. पण मी पैसे खिशात घेऊन बसतो का? असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं म्हणजे गुलाबी जॅकेट घालण्याएवढं सोपं नाही. अजितदादांचे हे गुलाबी स्वप्न आहेत. कारखाने चालवून उद्योगपतींबरोबर पार्टनरशिप करून राज्याचे मुख्यमंत्री होता येत नाही. असली गुलाबी स्वप्न अजित पवार यांनी बघू नयेत, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर केली. तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी केलेले दावे महाराष्ट्रातल्या ओबीसींची आणि सामाजिक न्याय विभागाची दिशाभूल करणारे असल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला.
अजित पवार निधी देत नाहीत, असं काहीजण म्हणतात. पण मी पैसे खिशात घेऊन बसतो का? असा सवाल काल अजित पवार यांनी केला होता. यावर हाके म्हणाले, खिशामध्ये निधी घेऊन बसायचे दिवस नाहीत, आता सुटकेस घेऊन फिरावं लागते दादा.. अशी टिप्पणी करत मंत्री शिरसाट यांनाही नुसती आदळ आपट करायला काय तुमची मजबुरी आहे, असे म्हणत गेल्या पाच वर्षात सामाजिक न्याय विभागाला 7 हजार 317 कोटीचा निधी कमी आला आहे. त्यामुळे या मंत्र्यांनीही पुढे यायला पाहिजे, असा सल्ला हाकेंनी शिरसाट यांना दिला.

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अॅम्ब्युलन्स, मुडदा अन्...

मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश

हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज

एअर इंडियाच्या पक्षी धडकला अन्... आणखी एक दुर्घटना टळली, बघा काय घडलं?
