Special Report | भाजप कार्यालयाबाहेर शेलारांविषयी आक्षेपार्ह पोस्टर
आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच लावलं आहे. या बॅनरवर आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय. त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टिकाही करण्यात आलीय.
मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. किशोरी पेडणेकर यांनी स्वत: मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शेलारांविरोधात तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कलम 354 अंतर्गत शेलारांविरोधात गुन्हा दाखल केला. मग शेलार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर सेना-भाजपमधील वाद शमत असतानाच आता पुन्हा एकदा शेलार आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळतंय. आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच लावलं आहे. या बॅनरवर आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय. त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टिकाही करण्यात आलीय.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
