Omicron Case in Buldana | बुलढाण्यात ओमिक्रॉन पहिला रुग्ण आढळला
चार दिवसानंतर हा रिपोर्ट प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आहे. मात्र बुलडाणा वासीयांना घाबरण्याची गरज नसून, ओमीक्रॉनग्रस्त व्यक्ती ठणठणीत असून 14 दिवसांच्या प्रोटोकॉलनंतर त्यांना सुटी देण्यात येणार आहे.
बुलडाणा : दुबईवरून बुलडाण्यात परतलेल्या 55 वर्षीय व्यक्तीची ओमीक्रॉन चाचणी पॉझिटिव्ह आली असून जिल्ह्यात ओमिक्रॉनने शिरकाव केलाय. सध्या शासकीय रुग्णालयात त्यावर उपचार सुरु आहेत. संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना कुठलीही लक्षणे नाहीत. तर दिलासादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्ती कोरोना निगेटिव्ह आहेत. मागील 9 डिसेंबर रोजी दुबईवरून आलेले हे 55 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांचा स्वॅब नमुना पुणे येथे ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. चार दिवसानंतर हा रिपोर्ट प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आहे. मात्र बुलडाणा वासीयांना घाबरण्याची गरज नसून, ओमीक्रॉनग्रस्त व्यक्ती ठणठणीत असून 14 दिवसांच्या प्रोटोकॉलनंतर त्यांना सुटी देण्यात येणार आहे. मात्र ओमीक्रॉनचा बुलडाणा जिल्ह्यात शिरकाव झाल्याचे स्पष्ट झालेय.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
