नाशिक : सिन्नर घोटी महामार्गावर मालवाहू ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भाऊसाहेब शांताराम टोचे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. भाऊसाहेब हे आपल्या भाचीच्या लग्नावरून घरी परतत होते. घरी परतत असताना हा अपघात झाला. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.