AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीच्या नुकसानीचे फोटो आले समोर

Operation Sindoor : मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीच्या नुकसानीचे फोटो आले समोर

| Updated on: May 07, 2025 | 1:39 PM

Kotali Masood Azar family photos : ऑपरेशन सिंदूरमध्ये लक्ष्य करण्यात आलेल्या कोटली येथील नुकसानीचे फोटो आता समोर आलेले आहेत. याच ठिकाणी मसूद अझर याचं कुटुंब देखील राहात होतं.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधल्या 9 दहशतवादी संघटनांच्या तळावर हवाई हल्ला केला आहे. मध्यरात्री केलेल्या या हल्ल्यानंतरचे कोटलीमधील नुकसानीचे फोटो आता समोर आलेले आहेत. कोटलीमध्ये एकूण दोन ठिकाणं लक्ष्य केली गेली होती. यात जैश-ए-मोहम्मदचं मरकज अब्बास देखील आहे. त्याचबरोबर कोटलीमधीलच मस्कर राहील शाहिद या ठिकाणाला देखील या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने टार्गेट केलं होतं. या दोन्ही ठिकाणांवर मिसाईल अटॅक करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता येथील नुकसानीचे फोटो समोर आलेले आहेत. याच ठिकाणच्या या मरकस अब्बासमध्ये दहशतवादी मसुद अझरचं कुटुंबं राहात होतं. या अटॅकमध्ये त्याचं पूर्ण कुटुंब नेस्तनाभूत झालं आहे.

Published on: May 07, 2025 01:39 PM