AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : भारताचा कट्टर दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला? टार्गेटवर असलेलं बहावलपूचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त जिथं हा राहायचा

Operation Sindoor : भारताचा कट्टर दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहर मेला? टार्गेटवर असलेलं बहावलपूचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त जिथं हा राहायचा

| Updated on: May 07, 2025 | 11:14 AM

बहावलपूरमध्ये जैशे मोहम्मदच हेडक्वार्टर भारतीय सेनेच्या निशाण्यावर होतं. येथेच भारताकडून हवाई हल्ला करण्यात आला आहे. बहावलपूरमध्ये जैशचं मुख्यालय होतं आणि याच मुख्यालयात मसूद अजहर राहायचा अशी माहिती मिळतेय.

भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भारताने पाकिस्तानसह पीओकेत हवाई हल्ला केला. ऑपरेश सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामध्ये मसूद अजहर आणि हाफिज सईदची ९ ठिकाणं उद्धवस्त कऱण्यात आली. भारतीय सेनेचा मुख्य हल्ला हा बहावलपूरमध्ये मसूद अजहरच्या तळावर होता. बहावलपूरमध्ये जैशे मोहम्मदच हेडक्वार्टर भारतीय सेनेच्या निशाण्यावर होतं. या हल्ल्यामध्ये जैशेचे टॉप आतंकवादी मारले गेलेची माहिती आहे. त्यामुळे भारताकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात भारताचा कट्टर दुश्मन अन् जैशचा म्होरक्या मसूद अजहरचं नेमकं काय झालं? हा सवाल केला जात आहे. मसूद अजहर मेला की जिवंत आहे? अशी चर्चा या निमित्ताने केली जात आहे. कारण ज्या ठिकाणाला भारताकडून लक्ष्य करण्यात आलं होतं त्या बहावलपूरमध्ये जैशचं मुख्यालय होतं आणि तेच उद्ध्वस्त कऱण्यात आलं आहे.

Published on: May 07, 2025 10:58 AM