पडळकर म्हणाले, सळो की पळो करुन सोडलं, उपटसुंभ म्हणत पवार यांनी फटकारलं
पडळकर यांनी नाशिकमध्ये बोलताना अजित पवार व शरद पवार यांच्यांवर जोरदार टीका केली होती. पडळकर म्हणाले होते की, ५० वर्षे तुम्ही राज्य केलात.
मुंबई : राज्यात सध्या राजकीय नेत्यांमध्ये वादच होताना दिसत आहेत. उर्फी जावेदवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या, खासदार सुप्रीया सुळे आणि भाजपच्या चित्रा वाघ यांचा वाद सध्या जोरदार चर्चेत आहे. याचदरम्यान आता विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कलगितूरा पाहायला मिळत आहे. अजित पवार यांना पडळकरांच्या टीकेवर विचारले असता ते भडकलेले दिसले.
अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्याती वाद आता उफाळून आला आहे. पडळकर यांनी नाशिकमध्ये बोलताना अजित पवार व शरद पवार यांच्यांवर जोरदार टीका केली होती. पडळकर म्हणाले होते की, ५० वर्षे तुम्ही राज्य केलात.
कुणालाही चाळीस वर्ष दिलं तर तो जिल्ह्याचा विकास करेल. यांनी फक्त बारामतीचाच विकास केला. तुम्ही एक हजार कोटी राज्य सरकारचे नेता. तुमच्याकडं तिजोरी दिली आहे. ती गडप करू नका. ती राज्याची तिजोरी आहे. तुमच्याकडं एका विश्वासानं राज्यानं दिली.
पडळकरच्या या टीके उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही. बातामतीत त्याचं डिपॉझिट जप्त करून घरी पाठवलंय. त्याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केलीय. अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
ते म्हणाले, पवार कुटुंबाला मी पुरून उतरलेलो आहे, अजित पवारांकडे सध्या उत्तर नाही. मी त्यांचं सरकार असताना त्यांना सळो की पळो करुन सोडलं, मी त्यांना योग्य वेळी उत्तर देईन.
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान

