Kunal Kamara Controversy : ‘.. म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला’ , अंबादास दानवेंची टीका
Ambadas Danve On Kunal Kamra Controversy : कुणाल कामरा याने शिंदे गटाच्या विरोधात बनवलेल्या गाण्यानंतर राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. अंबादास दानवे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ज्या लोकांना कोरटकर, सोलापूरकर हे शिवाजी महाराजांना बोलल्याचा रंग नाही आला. पण ज्यांना कॉमेडीयन बोलला त्याचा राग आला. त्यांनी आपल्यावर घ्यायची गरज नव्हती. कॉमेडी ही कॉमेडी म्हणून घ्यावी. पण त्यांना एवढा राग आला म्हणजे तो बोलला ते खरं आहे, अशी टीका विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. कॉमेडीयन कुणाल कामरा याने केलेल्या गाण्यानंतर सुरू झालेल्या वादावरून त्यांनी ही टीका शिंदे गटावर केली आहे.
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, सत्ताधारी लोकंच तोडफोड करतात. उद्यापासून दोन दिवस संविधानावर चर्चा सुरू होणार आहे आणि दुसरीकडे संविधानातल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला करता आहे. कुणाल कामरा याने बिलकुल माफी मागण्याची गरज नाही. आम्हीसुद्धा आमची भूमिका मांडतो. कुणालने त्याची भूमिका मांडली. त्यासाठी त्याने कोणाचीही माफी मागायची गरज नाही.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

