…अन्यथा 60 टक्के ओबीसी समाज सरकारला झोपू देणार नाही, बबनराव तायवाडे यांचा इशारा
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा कधीच विरोध नव्हता. परंतू मराठा समाजाच्या दबावाखाली येऊन सरकारने ओबीसीच्या वाटचे आरक्षण त्यांना देऊ नये. आमच्या संविधानिक अधिकारावर गदा आल्यास आम्हीही मुंबईला आंदोलन करु आणि सरकारला झोपू देऊ देणार नाही असा इशारा ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.
नागपूर | 23 जानेवारी 2024 : मराठा समाजाच्या दबावाखाली येऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याला आमचा अजिबात विरोध नाही. परंतू आमच्या आरक्षणाला धक्का लावाल तर 60 टक्के असलेला 400 जातीचा ओबीसी समाज सरकारला झोपू देणार नाही असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. मराठा कुणबी समाज म्हणून 54 लाख नोंदी सापडल्या असे म्हटले जात आहे. मागास वर्ग आयोगाचे सर्व्हेक्षण सुरु झाले आहे. हे सर्व्हक्षण करताना सरकारने या 54 लाख लोकांच्या घरी जावे त्यातील किती जणांकडे आधीच कुणबी प्रमाणपत्र आहेत आणि किती जण ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत हा आकडा सरकारने जाहीर करावा म्हणजे ओबीसी आणि मराठा समाजामधील संभ्रम दूर होईल असेही तायवाडे यांनी म्हटले आहे.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?

