Pahalgam Attack : अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
Pahalgam attack Pakistan proof : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत एनआयएने प्राथमिक तपास अहवाल सादर केला आहे.
पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानच्या काटाचे पुरावे मिळाले, असं एनआयएच्या सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. एनआयएच्या अहवालात पाकिस्तान विरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एनआयएकडून तयार करण्यात आलेला आहे. तसंच बेताब खोऱ्यात दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं देखील यात नमूद केलेलं आहे.
पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावेच आता एनआयएला मिळालेले आहेत. हा कट पाकिस्तानचा असल्याचे पुरावे सापडले असल्याच सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तान सोबतच आयएसआयच्या विरोधातले देखील पुरावे हाती लागले असून या हल्ल्याचा प्राथमिक अहवाल एनआयएने तयार केलेला असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे.