Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; दोन्ही देशांना शांततेचं आवाहन
Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मुद्दा जगभर गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटिश संसदेत यावर चर्चा करण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा आता ब्रिटिश संसदेत देखील उपस्थित करण्यात आला आहे. ब्रिटनकडून भारत आणि पाकिस्तानला शांततेच आवाहन करण्यात आलं आहे.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना गोळ्या घालून मारलं होतं. या घटनेचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटिश संसदेत पहलगाम हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करून दोन्ही देशांना शांततेच आवाहन ब्रिटनकडून करण्यात आलेलं आहे. यावेळी अनेक ब्रिटिश खासदारांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
Published on: Apr 30, 2025 01:27 PM
Latest Videos
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

