Pahalgam Terror Attack : व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या परिसरातील पर्यटन व्यवसाय आता ठप्प झाला आहे. जम्मू काश्मीरसह पहलगामचं अर्थचक्र हे पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे आता इथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी 26 पर्यटकांची निर्घृणपणे हत्या केलेली होती. त्यांनंतर भारत पाकिस्तानमध्ये एकीकडे तणाव वाढला आहे. तर दुसरीकडे पर्यटकांनी काश्मीरमधून काढता पाय घेतलेला आहे. जम्मू काश्मीरमधल्या पहलगामकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने तेथील जनजीवन मात्र पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या ठिकाणी पर्यटन हे एकच उत्पादनाचं साधन आहे. संपूर्ण अर्थचक्र हे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर सुरू असतं. पण आता पर्यटकांनी जम्मू काश्मीरकडे पाठ फिरवल्याने पहलगाममधील व्यापार ठप्प झालेला आहे. यामुळे अनेक लहानमोठ्या उद्योजकांचं नुकसान होतं आहे. अनेकांना आपलं घर आता कसं चालणार याची चिंता भेडसावत असल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

