Jayakwadi Dam : उपसा होणाऱ्या पाण्याच्या सहापट पाण्याचं बाष्पीभवन; जायकवाडीच्या साठयात झपाट्याने घट
Water Crisis In Sambhajinagar District : माराठवाड्यातल्या अनेक गावांची तहान छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून झपाट्याने पाणी साठा कमी होत आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून उपसा होणाऱ्या पाण्यापेक्षा सहापट जास्त पाण्याचे बाष्पीभवन होतं असल्याचं निदर्शनास आलं आहे. उन्हाळा संपण्यास अद्यापही दीड ते 2 महीने बाकी असताना उन्हाच्या तडाख्यामुळे जायकवाडीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे लवकरच पाणी टंचाईचं संकट येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात असलेल्या जायकवाडी धरणातून माराठवाड्यातल्या अनेक गावांची तहान भागते. यंदा हे धरण 100 टक्के भरलेलं होतं. मात्र आता उन्हाळा सुरू होताच तालुक्यातील तापमान बघता धरणाच्या पाण्यात रोजच्या उपशापेक्षा 6 पट जास्त बाष्पीभवन होतं असल्याचं समोर आलं आहे. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात सध्या तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे मोठ्याप्रमाणात बाष्पीभवन होतं आहे. या कारणाने धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट

