India – Pakistan : ‘पाणी बंद केले तर, १३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..’, पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
Pahalgam Terror Attack Updates : सिंधु जल करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. त्यानंतर पाकिस्तानकडून सतत भारताला पोकळ धमक्या देण्यात येत आहेत.
जर भारताने आमचे पाणी बंद केले तर युद्धासाठी तयार राहा. आम्ही गौरी, शाहीन, गझनवी आणि १३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी ठेवली आहेत. त्यांचे लक्ष भारताकडे आहे, अशी पोकळ धमकी पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. पाणी थांबवलं तर युद्धासाठी तयार रहा, असं हानिस अब्बास यांनी म्हंटलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधु जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाणी बंद केल्यास युद्धासारखी परिस्थिती तयार होईल अशी डरपोक्ती वारंवार पाकिस्तानकडून केली जात आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हानिस अब्बास यांनी देखील याबद्दल पोकळ धमकी देत, पाणी बंद केले तर युद्धासाठी तयार राहा. गौरी, शाहीन, गझनवी आणि १३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी ठेवली आहेत. पाकिस्तानच्या कोणकोणत्या भागात आम्ही ते ठेवलेले आहेत ते तुम्हाला माहीत नाही, अशी डरपोक्ती त्यांच्याकडून करण्यात आली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

