Smriti Mandhana Wedding : स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक, पण पलाश मुच्छलवरही उपचार सुरू, नेमकं झालंय तरी काय? मोठी अपडेट समोर!
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिचा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. लग्नमंडपातच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वडिलांची तब्येत पूर्ण बरी होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय स्मृतीने घेतला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा नियोजित विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. काल दुपारी साडेचार वाजता सांगली येथील मानधना फार्म हाऊस येथे लग्नाचा मुहूर्त होता. मात्र, विवाह मंडपातच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर श्रीनिवास मानधना यांना तातडीने सांगलीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
श्रीनिवास मानधना यांना छातीत दुखण्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सद्यस्थितीत त्यांचे रक्तदाब वाढलेले असून हृदयाचे ठोकेही जास्त आहेत, त्यामुळे त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. वडील पूर्णपणे बरे झाल्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय स्मृतीने घेतला आहे. या घटनेनंतर लग्नस्थळावरील सर्व सजावट हटवण्यात आली असून आलेल्या पाहुण्यांनाही परत पाठवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे स्मृती मानधना हिचा होणारा नवरा पलाश मुच्छल याची देखील प्रकृती बिघडली आहे. व्हायरल इन्फेकशन आणि पित्त वाढल्याने पलाश मुच्छलची तब्येत बिघडल्यानं त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या उपचारानंतर पलाश हॉटेलवर परतला आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळतेय.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

