Pune Wari 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज सासवडला मुक्काम
Palkhi Sohala Updates : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल रात्री सासवडला पोहोचली. आज पालखीने सासवडमध्ये मुक्काम केला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल पुण्याहून रवाना झाल्यानंतर काल रात्री सासवडला पोहोचली. दिवेघाटातील तब्बल ३२ किलोमीटरचा रस्ता पार करून पालखी सासवडपर्यंत पोहोचली. घाट चढून जाणं हा प्रवास थकवणारा असतो. त्यामुळे आजही वारकरी विश्रांतीसाठी सासवडला मुक्कामी थांबणार आहेत. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम फलटण तालुक्यातील पवारवाडीजवळ आहे. आज दिवसभर विश्रांती घेतली जाणार असून उद्या पालखी सासवड ते जेजुरी असा १५ ते १६ किलोमीटरचा टप्पा पार करेल.
दरम्यान, सासवड ते वाल्हे मार्गावर उद्या २४ जून रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर लोणंद ते बरड मार्गावर फलटण या घाट भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. २६ जून ते २९ जूनदरम्यान घाट भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पालखीच्या चौथ्या टप्प्यात बरड ते वेळापूर या मार्गावर माळशिरस येथे हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

