Pandharpur : हातात चिकन-मटणाचं पाकीटं येताच शाकाहारी विठ्ठल भक्त थरथरले, विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांसोबत BVG कंपनीचा प्रताप अन्….
विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बीव्हीजी कंपनीने चिकन मसाल्याच्या पाकिटांची भेट दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या पाकिटांवरील छायाचित्र आक्षेपार्ह असल्याने मंदिर समितीने कंपनीला नोटीस बजावली आहे आणि या प्रकाराचा निषेध करत कारवाईची मागणी केली आहे. तात्काळ हे वाटप थांबवण्यात आले आहे.
विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने चिकन मसाल्याच्या पाकिटांची भेट देण्यात आल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. बीव्हीजी कंपनीने सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी वाटलेल्या मसाल्याच्या कीटमध्ये चिकन मसाल्याच्या पाकिटांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच मंदिर समितीने तात्काळ बीव्हीजी कंपनीला नोटीस बजावली आहे. या मसाल्याच्या पाकिटांवरील छायाचित्र आक्षेपार्ह असल्याचे मंदिर समितीने म्हटले आहे. शिरवळकर महाराजांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करत, बीव्हीजी कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर घटना निदर्शनास आल्यानंतर कंपनीला तातडीने वाटप थांबवण्याचे आदेश देण्यात आले. मंदिर समितीमार्फत कालच कंपनीला नोटीस दिली असून, या प्रकरणी निश्चितच कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारची भेट देणे योग्य नसल्याची भूमिका अनेकांनी व्यक्त केली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

