Pandharpur News : भीमा नदी पात्रातल्या महादेव मंदिराला पुराचा वेढा, 3 साधू पुरात अडकले
Pandharpur Rain News : राज्यात मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे. पंढरपूरात भीमा नदीला पुर आलेला असल्याने या पुरात 3 साधू अडकले आहेत.
पंढरपूर येथे देखील भीमा नदीच्या पत्रात असलेल्या महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातलेला आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी तीन साधू हे या पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत.
राज्यात पावसाने थैमान घातलेलं आहे. त्यामुळे अनेक भागांना पुराचा फटका बसलेला आहे. पंढरपूरात देखील भीमा नदीच्या पात्रात असणाऱ्या महादेव मंदिराला पुराचा वेढा पडला आहे. यावेळी मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेले 3 साधू हे आता या ठिकाणी अडकून पडले असल्याची माहिती समोर आली आहे. हे मंदिर नदीच्या पत्रात आहे. यावेळी यचणक पाण्याची पातळी वाढल्याने हे तीनही साधू मंदिरातच अडकून पडले. सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम ह्या साधुना वाचवण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी रवाना झाली आहे. हे साधू गेल्या काही तासापासून पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

