AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur Rain : बदलापुरात पावसाचा कहर, भुयारी मार्गात साचलं पाणी, 10 फूट पाण्यात अडकली कार अन्...

Badlapur Rain : बदलापुरात पावसाचा कहर, भुयारी मार्गात साचलं पाणी, 10 फूट पाण्यात अडकली कार अन्…

| Updated on: May 26, 2025 | 3:18 PM
Share

कल्याण-डोंबिवली भागातही पावसानं कहर केल्याचे पाहायला मिळाले. अशातच बदलापुरात एका भुयारी मार्गात कार अडकल्याची घटना समोर आली आहे.

बदलापुरातून एक बातमी आहे. बदलापुरातील रेल्वेच्या भुयारी मार्गात चक्क कार अडकल्याची घटना समोर आली आहे. भुयारी मार्गात पाणी भरलं असताना त्यात कार अडकली आणि त्या कारमध्ये चालक देखील अडकून पडला होता. मात्र अथक प्रयत्नानंतर भुयारी मार्गात अडकलेली कार आणि कार चालक सुखरूप बाहेर पडल्याची माहिती आहे. बदलापूरच्या बेलवली भुयारी मार्गात ही घटना घडली. सकाळच्या सुमारास भुयारी मार्गात पाणी साचलेलं असतानाही कार चालकाने आपली कार नेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्येच तो फसल्याचे पाहायला मिळाले. सुदैवानं या घटनेमध्ये चालक सुखरूप असून आता रेल्वेकडून ही कार बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. भुयारी मार्गात दहा फुटापेक्षा जास्त पाणी साचलं असल्याची माहिती मिळतेय. यानंतर बदलापूरच्या बेलवली भुयारी मार्गातून कोणीही प्रवास करू नये म्हणून रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे.

Published on: May 26, 2025 03:18 PM