दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध

दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध

| Updated on: Oct 20, 2026 | 10:40 AM

विजयादशमीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दोन टन रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीचा गाभारा, सोळखांबी तसेच चारखांबीसह मंदिराचे इतर भाग विविध फुलांनी सजले आहेत. पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी ही विनामूल्य पुष्पसजावट सेवा दिली आहे.

विजयादशमीनिमित्त पंढरपूरच्या प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या पवित्रदिनी मंदिराला विशेष शोभा प्राप्त झाली आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सोळखांबी तसेच चारखांबी यासह मंदिराच्या विविध भागांना जवळपास दोन टन रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे.

पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्याकडून ही विनामूल्य पुष्पसजावट सेवा देण्यात आली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर झेंडूच्या फुलांना विशेष मान असतो, त्यामुळे ही सजावट झेंडूच्या फुलांबरोबरच गुलाब, ऑर्किड, सूर्यफूल, जाई आणि जुई अशा जवळपास वीस ते पंचवीस प्रकारच्या विविध फुलांनी करण्यात आली आहे. या सुंदर फुलांच्या सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलले असून, भाविकांना एक आल्हाददायक आणि विलोभनीय अनुभव मिळत आहे.

Published on: Oct 20, 2026 10:40 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us