Nagpur | भर रस्त्यात दोन गुंडांचा शस्त्रांसह हैदोस

हातात शस्त्र घेऊन दोन गुंड एका बाईकवरून आले. त्यांनी हॅपी फूड नावाच्या दुकानावर पहिला हल्ला चढवला. त्यात त्यांनी नागरिक आणि दुकानदाराला धमकावत रक्कम लुटली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. 

नागपूर : नागपूरच्या गजबजलेल्या माणेवाडा परिसरात दोन गुंडांनी भर दिवसा हैदोस घातला. शस्त्राचा धाक दाखवत तीन ठिकाणी तोडफोड करुन गुंडांनी लूटमार केल्याचा आरोप आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी दोन्ही गुंडांच्या मुसक्या आवळल्या असून हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. हातात शस्त्र घेऊन दोन गुंड एका बाईकवरून आले. त्यांनी हॅपी फूड नावाच्या दुकानावर पहिला हल्ला चढवला. त्यात त्यांनी नागरिक आणि दुकानदाराला धमकावत रक्कम लुटली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. त्यानंतर गुंडांनी एका पेट्रोल पंपावर हल्ला बोल केला, मात्र तिथे त्यांना लूट करता आली. पुढे एका तंदूर सावजी नावाच्या दुकानात ते पोहोचले आणि तिथेही त्यांनी हंगामा केला आणि पळून गेले. याची माहिती मिळताच तिन्ही ठिकाणी पोलीस पोहोचले आणि त्यांनी सीसीटीव्ही फूटेजचा आधार घेत या गुंडांचा शोध सुरु केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI