Mumbai-Goa महामार्गावरील परशूराम घाट दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद राहणार

चिपळूण (Chiplun) येथे स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत परशुराम घाटातील (Parashuram Ghat) वाहतुक महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी आज दुपारी 11 ते 5 कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 25 एप्रिल पासून अंदाजे महिन्याभरासाठी परशुराम घाटातील रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर चालणार आहे.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 25, 2022 | 11:33 AM

चिपळूण – चिपळूण (Chiplun) येथे स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत परशुराम घाटातील (Parashuram Ghat) वाहतुक महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी आज दुपारी 11 ते 5 कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 25 एप्रिल पासून अंदाजे महिन्याभरासाठी परशुराम घाटातील रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर चालणार आहे. पावळ्यापुर्वी काही कामे करायची असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच परशुराम घाटात पावसाळ्यात प्रवास करीत असताना प्रवाशांना अधिक त्रास होत होता. अवजड वाहने जात असताना इतर वाहनांना देखील त्रास व्हायचा त्यामुळे स्थानिक प्रशानसनाने रूंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज पासून परशुराम घाटातील वाहतुकीबाबतचे बदल लागू होतील अशी माहिती अधिकारी यांनी दिली. आता पर्यायी मार्गाने म्हणजे आंबडस – चिरणी – लोटे रस्ता व कळस – आंबड- धामणंद रस्ता मार्ग पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे. सर्व प्रकारची अवजड वाहने कराड (Karad) मार्गे जातील अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें