राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी… ‘कॅश’ टंचाईमुळे नागरिकांचे हाल
परभणी शहरात मागील काही दिवसांपासून रोख रकमेची मोठी टंचाई निर्माण झाली असून अनेक एटीएम बंद पडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
परभणी शहरात मागील काही दिवसांपासून रोख रकमेची मोठी टंचाई निर्माण झाली असून अनेक एटीएम बंद पडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्टेट बँक ऑफ इंडियाला रोख रक्कम पुरवली जाते. त्यानंतर शहरातील इतर बँकांना कॅशचे वितरण केले जाते. मात्र, सध्या स्टेट बँक ऑफ इंडियालाच पुरेसा निधी मिळत नसल्याने इतर बँकांनाही कॅशची कमतरता भासत आहे.
परभणीसह इतर ठिकाणीदेखील हीच समस्या उद्भवत आहे. मराठवाड्यातील अनेक बँकांमध्ये 500 रुपयांच्या नोटाच नाहीत. त्यामुळे राज्यासमोर आता नवं संकट येऊन उभं ठाकलं असल्याचं सांगितलं जात आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, वेतनधारक कर्मचारी आणि लग्नसराईमुळे रोख पैशांची गरज असलेल्या कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे. एटीएमवर वारंवार जाऊनही पैसे मिळत नसल्याने नागरिक नाराज आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांनाही याचा फटका बसत आहे. किरकोळ दुकानदार, भाजी विक्रेते आणि लहान व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही या परिस्थितीचा परिणाम दिसून येत असून, प्रशासनाने लवकरात लवकर एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
Published on: May 09, 2026 02:17 PM
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात

