Sanjay Raut | संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र

Sanjay Raut | संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र

| Updated on: Apr 17, 2026 | 10:55 AM

संसदेतील विशेष अधिवेशनादरम्यान महिला आरक्षण विधेयकावर काल चर्चा सुरू होती. मात्र त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यात शाब्दिक वाद, चकमक झाली. निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेत गंभीर आरोप केले, ज्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना शिवसेना (ठाकरे) खासदार अरविंद सावंत आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली.

संसदेतील विशेष अधिवेशनादरम्यान महिला आरक्षण विधेयकावर काल चर्चा सुरू होती. मात्र त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यात शाब्दिक वाद, चकमक झाली. निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेत गंभीर आरोप केले, ज्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना शिवसेना (ठाकरे) खासदार अरविंद सावंत आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली. सावंतांनी ब्रिजभूषण सिंह आणि कुलदीप सेंगर यांचा उल्लेख करताच, दुबे यांनी आदित्य ठाकरेंचे नाव घेत गंभीर आरोप केले, ज्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ निर्माण झाला.

या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली. “भाजपने काही भुंकणारे कुत्रे पाळून ठेवले आहेत, मराठी माणसावर भुंकण्यासाठी,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी हल्ला चढवला. तसेच, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी यावर भूमिका घ्यावी, असंही त्यांनी म्हटलं. राऊत यांनी पुढे आरोप करत, “भाजपच्या खासदाराने संसदेत विकृत मानसिकतेचं प्रदर्शन केलं,” अशी टीका देखील केली.

 

 

Published on: Apr 17, 2026 10:55 AM
Follow Us