Nashik Railway Accident : रेल्वेत चढताना हात सटकला, प्रवासी गंभीर जखमी
Nashik Railway Station News : मुंब्रा येथील अपघाताची घटना ताजी असतानाच नाशिकच्या रेल्वे स्थानकावर देखील अपघात झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
गाडी पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाचा हात सटकल्याने रेल्वेतून पडून अपघात झाला असल्याची घटना नाशिकरोड रेल्वे स्थानकावर घडली आहे. एकीकडे मुंब्रा येथील अपघाताची घटना ताजीच असताना हा अपघात घडल्याने रेल्वे सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, हा प्रवासी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हरिद्वार एक्सप्रेस या गाडीतून प्रवास करत असताना प्लॅटफॉर्मवर चढत असताना त्याचा हात सटकला. त्यानंतर तो खाली कोसळला. अपघातानंतर स्थानकावर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेल्वे पोलिसांचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. रेल्वे प्रशासन अधिक तपास करत असून जखमी प्रवाशाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?

