AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Gold Shop | सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो? व्यावसायिकांची प्रतिक्रिया काय?

Mumbai Gold Shop | सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो? व्यावसायिकांची प्रतिक्रिया काय?

| Updated on: May 12, 2026 | 3:05 PM
Share

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पुन्हा एकदा सोनं खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. देशाचे परकीय चलन वाचवणे आणि आर्थिक स्थैर्य राखणे आवश्यक असल्याचे सांगत मोदी यांनी नागरिकांना पुढील एक वर्ष सोनं खरेदी न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या आवाहनाचा सराफा बाजारावर फारसा परिणाम झालेला नसल्याची माहिती मुंबईतील झवेरी बाजारातून समोर आली आहे.

ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनच्या प्रवक्त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पंतप्रधानांच्या आवाहनानंतर बाजारात कोणताही मोठा फरक पडलेला नाही. लोक अजूनही सोन्याची खरेदी करत आहेत.” त्यांनी नागरिकांना गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी टाळण्याचे आवाहन करत, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने आवश्यक तेवढेच सोनं खरेदी करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, भविष्यात सोन्याचे दर दोन लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात, अशी भीती लोकांच्या मनात असल्याने अनेकजण आताच सोन्यात गुंतवणूक करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सोन्याचे दर दीड लाखांच्या आसपास असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी थांबलेली नसून बाजारात व्यवहार सुरूच असल्याचे त्यांनी नमूद केले.

Published on: May 12, 2026 03:05 PM
Follow Us