त्यांच्या रणनीतीने पाकिस्तानला…; तिन्ही सैन्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींने केले कौतुक!
संसद भवनात झालेल्या ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तिन्ही सुरक्षा दलांचं कौतुक केलं.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पहिल्यांदाच असं झालं की, आत्मनिर्भर भारताची ताकद जगाने पाहिली. मेड इन ड्रोन, मेड इन इंडिया मिसाईलने पाकिस्तानी हत्यारांची पोलखोल केली. एक महत्त्वाचं काम झालं आहे. राजीव गांधी असताना त्यांनी त्यांच्या डिफेन्सचं काम पाहणारे एमओस होते. मी सीडीएसची घोषणा केल्यावर ते खूश होऊन मला भेटायला आले होते. यावेळी ऑपरेशनमध्ये नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्स. तिन्ही सैन्याची संयुक्त कारवाई, त्यांची रणनीतीने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तिन्ही सुरक्षा दलांचं कौतुक केलं. आज लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करताना त्यांनी हे गौरवोद्गगार काढले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, आता हल्ल्यानंतर मास्टरमाइंडला झोप येत नाही. भारत येणार आणि मारून जाणार हे त्यांना माहीत आहे. जगाने पाहिलं आहे. आमच्या कारवाईची स्केल किती मोठी आहे. सिंदूरपासून सिंधूपर्यंत पाकिस्तानवर कारवाई करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिलं की, भारतात दहशतवादी हल्ल्याची त्यांच्या आकाना आणि पाकिस्तानाला मोठी किंमत चुकवावी लागेल. असंच जाऊ शकत नाही. ऑपरेशन सिंदूरने हे स्पष्ट होतंय की भारताने तीन सुपर ठरवले आहेत. भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर भारत आपल्या पद्धतीने, आपल्या अटीने आपल्या वेळेत उत्तर देणार, दुसरं म्हणजे, कोणीही न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग चालणार नाही. तिसरं म्हणजे, आम्ही दहशतवाद्यांची पाठराखण करणारी सरकार आणि त्यांच्या आकांना वेगळं पाहणार नाही, असंही पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

