पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया
जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन आणि गॅसचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे. हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून भारत मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करतो.
जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन आणि गॅसचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे. हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून भारत मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करतो. त्यामुळे नागरिकांनी गरजेनुसारच पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर करावा. कोविड काळात जशाप्रकारे लोकांनी संयमाने जीवनशैली स्वीकारली होती, तशीच सवय पुन्हा अंगीकारण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.
यावर नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. असे दिसून येते. नागरिकांना वाटते की, जसे आपण म्हणतो, “पाणी वाचवा, पाणी जिरवा”, तसेच जर पेट्रोलचे संकट ओढावले आहे तर आपण देशासाठी इतके नक्कीच करू शकतो. सिग्नल वर गाडी बंद करावी. तर काहींचे म्हणणे आहे की, जिथे पेट्रोल वापरण्याची गरज आहे आणि सार्वजनिक वाहनांच्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्यांच्यासाठी शासनाने काही विचार करावा.
Published on: May 11, 2026 11:54 AM
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक

