नरेंद्र मोदींचा आज जळगाव दौरा, कसं असणार नियोजन? ‘लखपती दीदीं’शी काय बोलणार पंतप्रधान?
आज पंतप्रधान मोदी हे जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी तेथील विमानतळ परिसरातील 100 एकर जागेमध्ये मोदींच्या लखपती दीदी कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्याात आली आहे. कार्यक्रमाला जवळपास एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी होण्याचा अंदाज आहे. तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगावात होणाऱ्या लखपती दीदी योजनेच्या एका मोठ्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांची हजेरी पाहायला मिळणार आहे. लखपती दीदी या योजनेच्या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध बचत गटातील महिलांशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी ११ वाजता नरेंद्र मोदी यांचं जळगावात विमानतळावर आगमन झालं असून विमानतळाच्या बाजूला असणाऱ्या बचत गटाच्या महिलांच्या स्टॉलला मोदी भेट देणार आहेत. बचत गटाच्या महिलांशी संवाद साधल्यावर लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमासाठी मोदी रवाना होणार आहेत. तर लखपती दीदी या योजनेच्या कार्यक्रमस्थळी विविध सांस्कृतीक कार्यक्रम पार पडणार आहेत. या सांस्कृतीक कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित महिलांना संबोधित करणार आहेत.तर दुपारी एक वाजत जळगाव विमानकळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना होणार आहेत.
Published on: Aug 25, 2024 12:42 PM
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
