AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 10 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावात; ‘लखपती दीदीं’शी साधणार संवाद

या कार्यक्रमाला जवळपास एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागले आहे.

तब्बल 10 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावात; 'लखपती दीदीं'शी साधणार संवाद
| Updated on: Aug 25, 2024 | 9:15 AM
Share

PM Narendra Modi Jalgaon Visit : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रविवारी (25 ऑगस्ट) ‘लखपती दीदीं’चा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जळगाव विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. सध्या जळगाव विमानतळ परिसरातील 100 एकर जागेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या लखपती दीदी कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली जात आहे. या कार्यक्रमाला जवळपास एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील लखपती दीदी कार्यक्रमासाठी 22 एकर क्षेत्रात भव्य वॉटरफ्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगावात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या वॉटरप्रुफ मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. त्यासोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण विमानतळ परिसरावर केंद्रीय यंत्रणांची करडी नजर पाहायला मिळत आहे. गेल्या 15 दिवसांपासून जळगाव विमानतळ परिसरात मंडप उभारण्यासह पार्किंगच्या सोयी-सुविधांचेही नियोजन केले जात आहे.

‘लखपती दीदी’चा मेळाव्यासाठी नरेंद्र मोदी जळगावात 

जळगावात सातत्याने पाऊस सुरु आहे. यामुळे कार्यक्रम स्थळी तयारी दरम्यान मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सभा मंडपात आणि कार्यक्रम स्थळी चिखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तयारी करताना प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्व अडचणींवर मात करून प्रशासनाकडून युद्ध पातळीवर तयारी केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील सभेच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील यांच्यासह सर्व आमदार, खासदारांकडून कार्यक्रमाच्या तयारीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या जळगाव जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘लखपती दीदी’चा मेळाव्यासाठी नरेंद्र मोदी जळगावात येणार आहेत. यावेळी बचत गटांच्या महिलांना नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत.

मोदी सभेत काय बोलणार याकडे लक्ष

तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्यामध्ये येत असल्याने सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागले आहे. पंतप्रधान मोदी या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने मोदींकडून जळगाव जिल्ह्यासाठी काही नवीन घोषणा केली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महाविकासआघाडीकडून विरोध केला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावातील सभेला महाविकासआघाडीच्या वतीने विरोध केला जाणार आहे. महाविकासआघाडीचे नेते तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मानवी साखळी बनवत हा विरोध करणार आहेत. मातोश्री लॉन्सपासून विमानतळाच्या भिंतीपर्यंत मानवी साखळी बनवत विरोध केला जाणार आहे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी यात सहभागी होणार आहेत. मातोश्री लॉन्स परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.