Sana Khan murder case : सना खान हत्याकांड प्रकरण! राजकीय नेते पोलिसांच्या ‘रडार’वर! मध्यप्रदेशमधील एका नेत्याला समन्स
भाजप नेत्या सना खान या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. 2 ॲागस्टला त्यांची हत्या झाल्याचे बोलले जात आहे. तर आरोपी अमित साहू आणि सना खान यांच्यात पैशावरुन वाद झाला. तर त्यातूनच सना खान यांची हत्या करण्यात आला.
मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | नागपुरातील भाजप नेत्या सना खान उर्फ हिना खान हत्या प्रकरणात नव नवे खुलासे समोर येत आहेत. याचदरम्यान आता सना खान आणि गुन्हेगार अमित साहू हे हनीट्रॅप चालवत होते अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. तर त्यात अनेक राजकीय नेते अडकल्याचेही कळत आहे. तर याप्रकरणी आता पोलिसांनी आपली मोर्चा मध्यप्रदेशकडे वळवला असून येथील राजकीय नेते हे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. तर आतापर्यंत सना खान हत्या प्रकरणी ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर त्यांना २५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलिसांनी मध्यप्रदेशमधील काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना समन्स बाजवला आहे. तर नागपुरात राहणाऱ्या भाजप नेत्या सना खान या २ ऑगस्ट २०२३ रोजी बेपत्ता झाल्या होत्या. तर सना खान हिची हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी पती अमित साहू यांच्यावर केला होता. तर सनाचा मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहिती मिळाली होती. मात्र तिचा मृतदेह सापडलेला नाही. तर सात एक दिवसांच्या आधी नर्मदा नदी पात्रात एक मृतदेह सापडला असून तो सनाचा असावा अशी शक्यता उपस्थित केली गेली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

