Pimpri-Chinchwad | हॉटेल व्यावसायिकाकडे लाच मागितल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन

आजारपणाच्या रजेवर असताना पुण्याच्या मुंढवामध्ये एका हॉटेल व्यवसायिकाकडे जाऊन पैशांची मागणी केली होती. याबाबत मुंढवा पोलिसांना कळविल्यानंतर त्याला दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड : हॉटेल व्यावसायिकाकडे लाच मागितल्याप्रकरणी शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांचे निलंबन करण्यात आले. पुण्यातील मुंढवा भागातील हॉटेल कार्निवलमध्ये शासकीय गणेवशात जाऊन पैशांची मागणी केली होती. यापूर्वीही कुरकुटे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर निलंबित करण्यात आले होते. निलंबन कालावधी संपल्यानंतर आयुक्तलयात नियंत्रण कक्षात सलग्न होता. आजारपणाच्या रजेवर असताना पुण्याच्या मुंढवामध्ये एका हॉटेल व्यवसायिकाकडे जाऊन पैशांची मागणी केली होती. याबाबत मुंढवा पोलिसांना कळविल्यानंतर त्याला दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI