Thane Election : जगणं झालंय छान कारण… ठाण्यात भा़जप आणि शिंदे सेनेकडून जोरदार बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
ठाण्यात भा़जप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या बॅनरवर 'नमो भारत नमो ठाणे' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच बरोबर 'जगणं झालंय छान कारण धनुष्यबाण' असा आशय शिंदे सेनेच्या बॅनरवर दिसतोय.
मुंबईसह राज्यभरात महानगरपालिका निवडणूक प्रचाराला जोरदार सर्वत्र सुरूवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात भा़जप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या बॅनरबाजीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. भाजपच्या बॅनरवर ‘नमो भारत नमो ठाणे’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच बरोबर ‘जगणं झालंय छान कारण धनुष्यबाण’ असा आशय शिंदे सेनेच्या बॅनरवर दिसतोय.
‘लाडकी बहीण योजना’, ‘मुलींना मोफत शिक्षण’ आणि ‘माझ्या लाडक्या भावाला मत धनुष्यबाणला’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात अशा प्रकारची बॅनरबाजी केल्याचे दृश्य पाहायला मिळतंय. माहितीनुसार, महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राजकीय पक्षाकडून ठाण्यात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जात असल्यानं ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
फडणवीस संतापले अन् स्पष्टच म्हणाले, काँग्रेस-MIM सोबत आघाडी कधीही...
भाजपसोबत नो, नेव्हर...जलील यांचा मोठा निर्णय; थेट नगरसेवकांनाच आदेश
भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नये, राज ठाकरे यांचा घणाघात
अंबरनाथमध्ये धक्कादायक युती! शिंदेंविरोधात भाजपची काँग्रेस,NCP शी युती

