AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | पालिका निवडणुकीआधी फडणवीस Vs ठाकरे

| Updated on: Aug 22, 2022 | 1:27 AM
Share

या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून याचे उत्तर देईलच अशा आशयाचं पत्रक उद्धव ठाकरेंनी काढलं.

मुंबई : एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी केलाय. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या विचारावर चालतात. त्यामुळं शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय. त्यामुळं उद्धव ठाकरेंनीही देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले. मोदीपर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे . भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार. या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता यांना मतपेटीतून याचे उत्तर देईलच अशा आशयाचं पत्रक उद्धव ठाकरेंनी काढलं.

Published on: Aug 22, 2022 01:27 AM