Sharmila thackeray | इतर पक्षांमधील अराजकीय घटना बघता चांगला महाराष्ट्र घडवायचा असेल तर सोबत या-tv9

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

Updated on: Aug 25, 2022 | 5:54 PM

तर सध्यासत्ताधाऱ्यांसह विरोधकांना पाऊस, महाराष्ट्रातील  रस्ते, शेतकरी आत्महत्या, एमपीएससीच्या मुलांच्या नोकरीचा प्रश्न याचं काहीही पडलेलं नाही. तर मी किती खोके खाल्ले... त्यांनी किती खाल्ले एवढेच महत्त्वाचे वाटतं आहे. त्यामुळे या प्रश्नांवर काहीतरी उपाययोजना करा असा सल्ला वजा टीका शर्मिला ठाकरे यांनी विरोधकांसह सत्ताधारी भाजप आणि शिंदे सरकारला केलेला आहे.

सध्या राज्यात सुरू असणाऱ्या सत्तासंघर्षावरून आणि अधिवेशनात झालेल्या आमदारांच्या राड्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी तोफ डागली आहे. तसेच शर्मिला ठाकरे यांनी, तुम्हाला चांगला महाराष्ट्र घडवायचा असेल तर आमच्या बरोबर या अशी साद महाराष्ट्रातील जनतेला घातलेली आहे. तसेच दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, त्याच्यावरती चर्चा करण्याच्या ऐवजी बाहेर रेसलिंग ची मॅच चालू होती. तर आपली सगळ्या पक्षांना अपील आहे की, पुढच्या वेळेला चांगले उमेदवार देण्यापेक्षा पैलवान किंवा जुडवाले यांना आमदारकी द्या म्हणजे सगळेच प्रश्न मार्गी लागतील. तर सध्यासत्ताधाऱ्यांसह विरोधकांना पाऊस, महाराष्ट्रातील  रस्ते, शेतकरी आत्महत्या, एमपीएससीच्या मुलांच्या नोकरीचा प्रश्न याचं काहीही पडलेलं नाही. तर मी किती खोके खाल्ले… त्यांनी किती खाल्ले एवढेच महत्त्वाचे वाटतं आहे. त्यामुळे या प्रश्नांवर काहीतरी उपाययोजना करा असा सल्ला वजा टीका शर्मिला ठाकरे यांनी विरोधकांसह सत्ताधारी भाजप आणि शिंदे सरकारला केलेला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI