शेवटी सर्वोच्च न्यायालय आशेचा किरण : संजय राऊत
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्तासंघर्षावर प्रतिक्रिया देताना, सर्वोच्च न्यायालय हा आशेचा किरण आहे. तर सत्तासंघर्षाचा निकाल हा आपल्या बाजूने लागेल असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला.
मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ही सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. यादरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्तासंघर्षावर प्रतिक्रिया देताना, सर्वोच्च न्यायालय हा आशेचा किरण आहे. तर सत्तासंघर्षाचा निकाल हा आपल्या बाजूने लागेल असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला. यावेळी लोकशाही वाचवणं हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचेही म्हटले आहे. याचवेळी त्यांनी गौतम आदानी यांची चौकशी का होऊ नये? मित्रांची होते. मग शेकडो हजारो कोटीला देश बुडवणाऱ्याची चौकशी का नको असा सवाल केला आहे.
Published on: Mar 16, 2023 03:28 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

