‘चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला असुदे पण…’, सरकारवर टीका करताना बच्चू कडूंची जीभ घसरली
राज्यातील राजकीय वर्तुळात पुढचा राज्यातील मुख्यमंत्री कोण होणार? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? याची चांगलीच चर्चा रंगतेय. या चर्चेदरम्यान, गिरीश महाजन यांना याबाबत सवाल केला असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं. तर यासंदर्भात बच्चू कडू यांची सरकारवर टीका करताना जीभ घसरली आहे.
‘भाजपात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकच आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा… भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोणी असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहेत. यासंदर्भातील सगळे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील त्याचे अधिकार आम्हाला नाहीत. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत.’, असं वक्तव्य काल भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा आगामी चेहऱ्या संदर्भात गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे. ‘मुख्यमंत्री आपला व्हावा यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीत चढाओढ सुरू आहे मात्र ते चुकीचे आहे. जनतेसाठी आपण काय करू शकतो हे सरकारने पाहिला हवं. मुळात तुमच्या चेहऱ्यावर कोणी मतदान करत नाहीतर तुमच्या मुद्दांवर मतदान केले जाते आणि तिच भूमिका बच्चू कडूंची आहे.’, असे स्पष्टपणे बच्चू कडू म्हणाले तर आता निवडणुका जवळ आल्यात तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला. चेहऱ्याला बघून चाटायचं का त्यांना? चेहरा कितीही चांगला असुदे पण डोक्यातील विचार जर शेतकरी, मजुराला मारणारे असतील तर तुमच्या चेहऱ्याला पाहून काय करणार? असा खोचक सवाल कर सरकारवर टीका करताना बच्चू कडूंची जीभ घसरली आहे.