शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच प्राजक्त तनपुरे भावुक, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 30, 2026 | 2:58 PM

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतल्याचे सांगितले. “आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मी माझ्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतल्याचे सांगितले.
“आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. विधान परिषदेवर संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मी माझ्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. मात्र जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याशी थेट बोलण्याची हिंमत झाली नाही. मी माझी भूमिका आणि भावना सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली होती,” असे तनपुरे म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय सोपा नव्हता, असे सांगताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याची खंत आजही असल्याचे स्पष्ट केले. तसेच ईडीच्या भीतीपोटी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या चर्चांनाही त्यांनी फेटाळून लावले. “आमच्या कारखान्याला आलेली नोटीस रद्द झाली आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली किंवा भीतीपोटी हा निर्णय घेतलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रीपदाबाबत बोलताना तनपुरे म्हणाले, “माझा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. मला चण्याच्या झाडावर चढवू नका. सध्या मंत्री होण्याची कोणतीही अपेक्षा नाही.”
राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, आगामी विधान परिषद निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. राहुरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती आणि सहकारी क्षेत्रातील त्यांचा प्रभाव लक्षात घेता त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे संघटनात्मक बळ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: May 30, 2026 2:57 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us