Video | नवाब मलिकांची भूमिका संघासारखी, मुस्लीम आरक्षणावरुन प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

: मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी तसेच मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.  नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणाला धरून घेतलेली भूमिका योग्य नाही. वस्तूस्थितीला धरून नाही. मराठा आरक्षणासोबत मुस्लिमांना 5 टक्के आरक्षणासंदर्भात जीआर काढले होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Dec 26, 2021 | 8:41 PM

मुंबई : मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी तसेच मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.  नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणाला धरून घेतलेली भूमिका योग्य नाही. वस्तूस्थितीला धरून नाही. मराठा आरक्षणासोबत मुस्लिमांना 5 टक्के आरक्षणासंदर्भात जीआर काढले होते. मात्र हा मुद्दा कोर्टात गेला. मात्र नवाब मलिक 50 टक्केची रेष मोडत आहे असे सांगतात. नवाब मलिक यांची भूमिका आरएसएसप्रमाणे आहे. आरएसएसची भूमिकासुद्धा मुस्लिमांना आरक्षण मिळू नये अशीच आहे.  मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण लागू करावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें