Prakash Mahajan : उभे राहिले तर लवंगा, बसले तर विलायची..; मनसे नेत्यांकडून राणेंवर खोचक टीका
Prakash Mahajan Slams Nitesh Rane : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर मंत्री नितेश राणे यांनी उडवलेल्या खिल्लीनंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
नितेश राणे यांची वैचारिक ऊंची ही लवंगाएवढी असल्याची टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. नितेश राणे यांची वैचारिक ऊंची खाली बसल्यावर विलायचीएवढी आहे, असं महाजन यांनी म्हंटलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर मंत्री नितेश राणे यांनी खिल्ली उडवली होती. त्यावरून आता प्रकाश महाजन यांनी राणेंवर चांगलीच टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने 2024ला एकाला 20 आमदार दिले आणि दुसऱ्याला 0 दिले. भरपूर ताकद आहे, आम्ही एवढं घाबरलोय की आम्हाला झोप लागत नाही. आता आमचं कसं होणार असं विचार करून आम्हाला घाम फुटले, अशी खिल्ली राणे यांनी ठाकरे बंधुच्या युतीच्या चर्चेवर उडवली होती. त्यानंतर आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे. लोकसभेत रत्नागिरीत राज ठाकरेंना सभा का घ्यायला लावली? सभा घ्या सांगायला तुम्ही तर घरी गेले होते राज ठाकरेंच्या. नितेश राणे यांना मी गांभीर्याने घेत नाही. त्यांची वैचारिक ऊंची आणि वैचारिक रुंदी उभे राहिले तर लवंगा एवढी आहे आणि बसले तर विलायची एवढी आहे. वैचारिक खोली त्या माणसाला नाहीच. अशा माणसाचं काय गांभीर्याने घ्यायचं? अशी खोचक टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..

