प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक प्रतापगड किल्ला आज ३६७ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेला हा किल्ला १७ व्या मशाल महोत्सवाचा साक्षीदार बनला. दरवर्षी नवरात्रीमध्ये आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक प्रतापगड किल्ला आज ३६७ मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेला हा किल्ला १७ व्या मशाल महोत्सवाचा साक्षीदार बनला. दरवर्षी नवरात्रीमध्ये आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावर्षीचा महोत्सव विशेष होता, कारण भवानी मातेच्या मंदिराला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत, ज्यानंतर हा मशाल महोत्सव सुरू करण्यात आला.
आज या महोत्सवाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने हा महोत्सव यशस्वी होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी हजारो शिवभक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे नागरिक प्रतापगडावर उपस्थित होते. डोळ्याचे पारणे फेडणारा हा क्षण अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. कॅमेरामन आमीर शेख सह संतोष नलवडे, टीव्ही ९ मराठी, प्रतापगड, सातारा.
