प्रविण दरेकर यांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन
प्रवीण दरेकर , राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे पाच उमेदवार भाजपतर्फे विधान परिषदेची निवडणूक लढवतील. नावं जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे संभाव्य उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत. प्रवीण दरेकर , राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड हे पाच उमेदवार भाजपतर्फे विधान परिषदेची निवडणूक लढवतील. नावं जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच बिहार या तिव्ही राज्यातील आगामी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-2022 साठीची नावं जारी केली आहेत. यात महाराष्ट्रातील या पाच नावांवर शिक्कामोर्तब झालं आहे. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपने दुसऱ्यांदा विधान परिषदेची संधी दिली आहे. तर राम शिंदे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

