Nagpur | पालकउत्पादक शेतकरी संकटात, पालकभाजी 2 ते 3 रु किलो
शेती हा मुख्य व्यवसाय, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हे ऐकायला बरं वाटत असलं तरी प्रत्यक्ष बांधावरची आणि बाजारपेठेतील स्थिती काय आहे याची अनुभती सध्या (Nagpur Market) नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये पाहवयास मिळत आहे.
नागपूर : शेती हा मुख्य व्यवसाय, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हे ऐकायला बरं वाटत असलं तरी प्रत्यक्ष बांधावरची आणि बाजारपेठेतील स्थिती काय आहे याची अनुभती सध्या (Nagpur Market) नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये पाहवयास मिळत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मुख्य पिकांच्या उत्पादनात घट तर झालीच आहे पण यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी (Vegetable Cultivation) पालेभाज्याची लागवड केली. पीक शेतकऱ्यांच्या हातामध्ये नव्हते तेव्हा (Vegetable Rate) दर गगणाला भिडले होते पण आता पालकाची जुडी ही 2 ते 3 रुपयांना विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. लागवड, जोपासणा, वाहतूकीचा खर्च आणि पालकाला मिळत असलेला दर यामुळे बळीराजा एकच प्रश्न विचारत आहे तो म्हणजे सांगा शेती करायची कशी? भाज्यांचे थोडे दर वाढले, की महागाईच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांसाठी ही बातमी. दोन – तीन रुपयांना पालकाची जुडी विकण्याची नामुष्की असल्याने लेकराबाळांचं पोट कसं भरायचं? हा सवाल शेतकरी करीत आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

