WITT Global Summit : … तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन
भ्रष्टाचार, घोटाळे, पॉलिसी पॅरालिसीस, घराणेशाही या सर्वांनी देशाचं कंबर तोडलं, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तर गेल्या दहा वर्षात आम्ही या भयावह स्थितीतून देशाला बाहेर काढलं असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
नवी दिल्ली, २६ फेब्रवारी २०२४ : पराभूत मनाने विजय मिळणं कठिण आहे. जी झेप आम्ही घेतलीय ती अद्भूत आहे. दशकापर्यंत ज्यांनी सरकार बनवलं त्यांचा भारतीयतेच्या सामर्थ्यावर विश्वास नव्हता. त्यांनी भारतीयांना अंडरइस्टिमेट केलं. त्यांनी त्यांच्या सामर्थ्याला कमी लेखलं. तेव्हा लालकिल्ल्यावरून सांगितलं जायचं भारतीय निराशावादी आहे. पराजय भावनेला स्वीकारणारे आहोत. लालकिल्ल्यावरून भारतीयांना आळशी संबोधलं गेलं. कामचुकार म्हटलं गेलं. जेव्हा देशाचं नेतृत्वच नैराश्याने भरलेलं असेल तर देशात आशेचा संचार कसा होईल? त्यासाठी देशातील लोकांनीही ठरवलं होतं, आता देश असाच चालेल. त्यात भ्रष्टाचार, घोटाळे, पॉलिसी पॅरालिसीस, घराणेशाही या सर्वांनी देशाचं कंबर तोडलं, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तर गेल्या दहा वर्षात आम्ही या भयावह स्थितीतून देशाला बाहेर काढलं आहे. केवळ दहा वर्षात भारत जगाची टॉप फाईव्ह अर्थव्यवस्थेत आला आहे. आज देशात गरजेची धोरणं वेगाने होतात आणि निर्णय त्याच वेगाने घेतले जातात. माइंडसेटच्या बदलाने हे घडवून आणले,. २१ व्या शतकातील भारताने संकुचित विचार करणं सोडलंय, असे मोदी म्हणाले.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

