Prithviraj Chavan : भगवा नव्हे तर हिंदू दहशतवाद म्हणा… मालेगाव बॉम्बस्फोटावर माजी मुख्यमंत्री काय बोलून गेले?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींना एनआयए न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर, एका नवीन वादाला जन्म मिळाला आहे. हिंदू दहशतवादावर सुरू असलेल्या चर्चेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पाऊल पुढे जाऊन त्यात सनातनचाही समावेश केला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा एनआयए न्यायालयाने नुकताच निकाल जाहीर केला. २००८ मध्ये मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलेल्या सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपींविरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याने त्यांना दोषी ठरवता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले. या निकालामुळे राजकारणात खळबळ उडाली. अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘आरोपींना सुटका मिळावी म्हणून हे प्रकरण जाणूनबुजून कमकुवत करण्यात आले’, असे चव्हाणांनी म्हटले तर केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की ‘भगवा दहशतवाद’ सारखे शब्द वापरू नयेत. त्याऐवजी ‘हिंदू दहशतवादी’ किंवा ‘सनातनी दहशतवादी’ सारखे शब्द वापरा.., असं वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होण्यास सुरूवात झाली. तर भारतातील पहिला दहशतवादी हा नथुराम गोडसे असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

