“सौंदर्य पाहून आदित्य ठाकरे यांच्याकडून खासदारकी”, संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रियंका चतुर्वेदी भडकल्या; म्हणाल्या…
आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर बोलताना मोठा दावा केला. आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहून त्यांना खासदारकी दिली, असं संजय शिरसाट म्हणाले. यावरून आता स्वत: प्रियंका चतुर्वेदी यांनी संजय शिरसाट यांना तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई, 31 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला. यावेळी ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. “एकदा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले होते की, आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदी यांचं सौदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली”, असं खळबळजनक विधान त्यांनी केलं. यावर आता स्वत: प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत हे प्रत्युत्तर दिले आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने ५० खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला.”
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

