राज ठाकरेंच्या सभेसाठी ठाण्यात जय्यत तयारी
आज राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा पार पडणार आहे.राज ठाकरे हे आजच्या सभेमध्ये आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देतील असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान त्यापूर्वी राज ठाकरे यांच्या सभेची ठाण्यात जय्यत तयारी सुरू आहे. अवघे ठाणे भगवे झाल्याचे दिसून येत आहे.
आज राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा पार पडणार आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वी घेतलेल्या सभेमध्ये हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत देखील प्रश्न उपस्थित केला होता. यावरून विरोधकांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरे हे आजच्या सभेमध्ये आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देतील असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान त्यापूर्वी राज ठाकरे यांच्या सभेची ठाण्यात जय्यत तयारी सुरू आहे. अवघे ठाणे भगवे झाल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. ठाण्यात आज राज ठाकरे यांची जंगी सभा होण्याचा अंदाज आहे.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

