Hasan Mushrif | 2 दिवसात आरोप सिद्ध करा, हसन मुश्रीफांचं सोमय्यांना प्रत्युत्तर

दोन आठवड्यांच्या आत आरोप सिद्ध केला नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करणार. सात अब्रू नुकसानीचे दावे केले आहेत कोणीही उठावं आणि आपल्यावर आरोप करावे हे मी खपून घेणार नाही आणि मला करावाच लागेल, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

मुंबई : मंत्रिमंडळाच्या बैठकीत मला टेंपरेचर जरा जाणवलं डॉक्टर म्हणाले की, डेंग्यूची साथ आहे. माझ्या प्लेटलेट्स ही कमी झाल्या होत्या. त्यामुळे मी ऍडमिट झालो होतो. किरीट सोमय्या यांनी कारखाना जवळून नाही तर आतमध्ये जाऊन पहावा. जगातले अद्भुत कारखाने शेतकऱ्याच्या श्रमातून आणि सहकार्यातून हा कारखाना उभा राहिलाय. ऊस गाळप खाली काढलं जात याचबरोबर गुळही काढला जातो. इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती द्या मग तुमच्या लक्षात येईल. माझ्या मंत्रिमंडळातल्या काळातला एकही काळापैसा सिद्ध करावा. दोन आठवड्यांच्या आत आरोप सिद्ध केला नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करणार. सात अब्रू नुकसानीचे दावे केले आहेत कोणीही उठावं आणि आपल्यावर आरोप करावे हे मी खपून घेणार नाही आणि मला करावाच लागेल, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI