मुंबई, पुण्यासह 7 शहरांमध्ये आता पुराचा धोका नाही, अमित शाह यांचा मोठी घोषणा
VIDEO | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्या 'या' तीन मोठय़ा योजना जाहीर
नवी दिल्ली : राज्यामध्ये अग्निशमन सेवेच्या विस्तारासाठी आणि आधुनिकीकरणासाठी पाच हजार कोटी रूपयांची मदत दिली जाईल. मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकत्त, बंगळुरू, हैदराबाद आणि अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या महानगरातील पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटींची तरतूद केली आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केली. यावेळी अमित शाह यांनी राज्यातील अग्निशमन सेवा आधुनिक करण्यासाठी सात प्रमुख शहरांतील पुराचा धोका कमी करण्यासाठी आणि १७ राज्यातील भूस्खलन रोखण्यासाठी आठ हजार कोटींहून अधिक किमतीच्या तीन मोठ्या योजनाही जाहीर केल्या आहेत. तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना शाह यांनी देशात कुठेही कोणत्याही अपत्तीत एकही नागरिक मृत्यू पडू नये, यासाठी पावले उचलण्याचे आवाहनही केले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

