Ravindra Dhangekar Video : ‘तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही’, रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
अजितदादांबद्दल चुकीचं वक्तव्य कार्यकर्ता सहन करणार नाही असं म्हणत पुण्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने रवींद्र धंगेकर यांना इशारा दिला आहे.
पुण्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसचे माजी आमदार आणि नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या रवींद्र धंगेकर यांना टोकाचा इशारा दिला आहे. अजित पवार यांच्याबद्दल एकही चुकीचं वक्तव्य कार्यकर्ता सहन करणार नाही, असं म्हणत तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही, दीपक मानकर यांनी रवींद्र धंगेकरांना इशारा दिला आहे. दीपक मानकर हे राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष आहे. दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार होती, म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला होता. या आरोपावर धंगेकरांनी बोलताना आपली भूमिका मांडत असताना अजित पवारांचाही उल्लेख केला होता. अजितदादांना तर यांनी जेलच्या दारात बसवलं होते. ट्रकभर पुरावे सादर केले होते. पंतप्रधान मोदी यांनीदेखील अजित पवारांवर टीका केली होती. पण त्यांना पक्षासोबत घेऊन अर्थमंत्री करण्यात आलं, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटले होते. यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धंगेकरांना इशारा दिला आहे.

ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?

शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका

कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
